धाड्स

आनंद पांचाळ
(सं.अध्यक्ष)
ऊमेश धर्माधिकारी
(सं.सचिव)

“काम करत गेलो नाव होत गेलं”

जिथं चार लोक  एकत्र येतात तिथं नेतृत्व येतंच

आशाच नेतृत्वाची ठिणगी 2011साली दयानंद वाणिज्य माहाविद्यालयात पडली आणि “धाड्स” या नावाचा जन्म झाला…

2011 ला धाड्स ने पहिली शिवजयंती साजरी केली

2012 ला धाड्स ने पहिल्यांदा मुलीचे ढोल-पथक सादर केले

2013 ला धाड्स ने नाट्यक्षेत्रात पहिले पाऊल टाकले
(नाटकाचे 4 प्रयोग यशस्वी)

2014 ला रितेश देशमुख यांच्या प्रो कब्बडी च्या प्रोमो मध्ये काम केले..(Youtube)

2015 ला लातूरच्या इतिहासातील पहिली दही-हंडी धाड्स ने फोडली

2016 ला लातूरचा राजा गणपतीला प्रथम मान देण्याची परंपरा धाड्स ने सुरु केली

2016 धाड्स ने कर्नाटक गाजवले

अनेकदा खचलो पण आमच्यासोबत आसे काही प्रसंग घडले की त्यापासुन आम्हाला ऊर्जा मिळत गेली .कदाचित प्रसंग सांगायला शब्दही पुरणार नाहीत. त्यामुळे कधी भेट झाली तर प्रत्यक्ष चहा घेऊन शेअर करू….

आमच्या नावातंच सर्वकाही आहे “धाड्स”

या नावामुळे नेहमी प्रेरित होत गेलो ….

प्रत्येकाला येणारी मुळ आडचण म्हणजे पैसा ‘अर्थकारण’

2011 ला आमच्याकडे 2 ढोल होते .. तेही फक्त 1400रूपायांचे  आणि त्यावेळी 1400 म्हणजे अंगावर आभाळ  पडल्यासारखे वाटायचं… आज 60 ढोल आहेत ..10 ताशे ..जवळपास2,00,000 रूपयाची सामग्री..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असंख्य  मित्राचे पाठबळ ..आई -वडिलांचा  आशीर्वाद

प्रा. सत्यशिल सावंत संराचे  मार्गदर्शन .चार भावाची साथ आणि मित्रांची अफाट सहकार्य आणि प्रेम ..यामूळेच आजतागयात महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात पोहचलो व कर्नाटकातही  पाऊल टाकले….

आणि 2017 ला हैदराबाद येथील जगप्रसिध्द रामनवमी धाड्स ने गाजवली…..

!!धन्यवाद!!                       (धाड्स ग्रुप लातूर)

आनंद पांचाळ
(सं.अध्यक्ष)

ऊमेश धर्माधिकारी
(सं.सचिव)